मुंबई: मुंबई शहरासह उपनगरांमध्ये रविवारी अंशतः ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे. शनिवारी मुंबईत ढग दाटून आले होते.
रविवारी सायंकाळी ढगांची गर्दी कायम राहील. तसेच काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असे सांगण्यात आले आहे. तापमानाचा आढावा घेतल्यास, सांताक्रुझ वेधशाळेच्या साप्ताहिक फोरकास्टनुसार, शुक्रवारी किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25 आणि 34 अंश सेल्सिअस इतके होते. रविवारी आणि सोमवारी शनिवारच्याच कमाल तापमानाची पुनरावृत्ती होईल. मात्र, किमान तापमानात एका अंशाने वाढ होईल.