Mumbai Waterlogging Video pudhari
मुंबई

Mumbai Waterlogging Video: महापौरांसमोरच मुंबईकर गेला खड्ड्यात... पाहणी दौऱ्यावेळी नेमकं काय झालं, चूक कोणाची?

Anirudha Sankpal

Mumbai Waterlogging Viral Video: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाल्यानं सर्वांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा एवढा जोर नसला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर चांगली संततधार सुरू आहे. प्रथे प्रमाणे पहिल्या पावसात मुंबईची तुंबई होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे यांनी थेट रस्त्यावर जाऊन पाणी कुठं तुंबलं आहे आणि प्रशासन कशा प्रकारे काम करत आहे याची पाहाणी केली.

महापौरांसमोरच खड्ड्यात

मात्र या पाहणी दौऱ्यावेळीच एक अजब प्रकार घडला. महापौर रितू तावडे या तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासन कशा प्रकारे काम करत आहे याची पाहणी करून अधिकाऱ्यांना सुचना देत असतानाच एका मुंबईकराने थेट खड्ड्यातच लोटांगण घातलं.

रितू तावडे या फुटपाथवर उभ्या राहून अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेत होत्या. त्यावेळी शेजारीच एक खड्डा होता. तिथं पाणी साचलं होतं. प्रशासनानं सावधानतेचा बोर्ड देखील लावला होता. मात्र या सामान्य मुंबईकराला रस्त्यावर कॅमेऱ्यांची इतकी गर्दी का आहे याचं कुतूहल निर्माण झालं असलावं. त्यामुळंच या सावधानतेच्या बोर्डकडे त्याचे लक्ष गेले नाही अन् तो थेट ड्रेनेजच्या खड्ड्यात कोसळला. तो चांगला कंबरेपर्यंत आत गेला होता.

महापौर थेट रस्त्यावर

यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला सावरून वर खेचलं. रितू तावडे या प्रशासनाला सुचना करत असतानाच हा प्रकार घडला. त्यामुळं त्यांनाही घडल्या प्रकाराची काही कल्पना आली नाही.

दरम्यान, पावसाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत काही ठिकाणी पाणी तुंबल्यानंतर महापौर रितू तावडे या थेट रस्त्यावर उतरून परिस्थितीची माहिती घेत होत्या. त्यावेळी त्यांनी एएनआयशी संवाद देखील साधला.

रितू तावडे म्हणाल्या, 'मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस सुरू झाली ही चांगली गोष्ट आहे. मुंबईकरांनी या पावसाचा आनंद घेतला पाहिजे. मी सध्या गांधी मार्केट परिसरात आहे. इथले पंप काम करत आहेत. इथल्या रस्त्यावर अजिबात पाणी साचलेलं नाही. ते स्वच्छ आहेत. मुंबई महानगर पालिकेचे संपूर्ण प्रशासन हे रस्त्यावर उतरून काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT