Water Tanker Pudhari File photo
मुंबई

Mumbai water crisis | मुंबईत अचानक उद्भवली पाणीबाणी

नागरिकांचे हाल, पाण्यासाठी टँकरचा आधार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १,६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे बुधवारी रात्री उशिरा आढळून आले. त्यामुळे महापालिकेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी ग्रँट रोडसह भायखळा, नागपाडा, प्रभादेवी वरळीमध्ये गुरुवारी सकाळी पाणीच आले नाही. त्यामुळे अक्षरशः पाणीबाणी उद्भवली होती. यावेळी नागरिकांचे अतोनात हाल झाले अखेर पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला.

या भागाला बसला फटका

  • डी विभाग (ग्रँट रोड)

लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बलराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पाथे बापूराव मार्ग तसेच संपूर्ण मुंबई सेंट्रल परिसर, ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड

गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड, एम. पी. मिल्स कंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव आंबेडकर नगर कॉलनी, केशवराव खाड्ये रोड

  • ई विभाग (भायखळा)

* के. के. मार्ग, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, कस्तुरबा रुग्णालय, मौलाना आझाद रोड, डेल स्ट्रीट, डॉ. आनंदराव नायर रोड, मेघराय सेठी मार्ग, मराठा मंदिर रोड, मोहम्मद शहीद मार्ग, कामाठीपुरा १ ते १४ वी गल्ली, चंद्रमणी बुद्ध विहार रोड, आग्रीपाडा परिसर, डॉ. आनंदराव नायर रुग्णालय.

  • वरळी जी दक्षिण

* जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग, धोबीघाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT