‘तसू’ नावाच्या व्यक्तीच्या अनधिकृत घरावर सोमवारी म्हाडाकडून थेट तोडक कारवाई करण्यात आली.  Pudhari
मुंबई

Vikhroli MHADA Demolition | विक्रोळीमध्ये म्हाडाची धडक कारवाई: ड्रग्स प्रकरणातील ‘तसू’च्या अनधिकृत घरावर बुलडोझर

Mumbai News | परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

Drug Accused Tasu Vikhroli

विक्रोळी: विक्रोळी परिसरात अमली पदार्थ विक्री प्रकरणाशी संबंधित असलेल्या ‘तसू’ नावाच्या व्यक्तीच्या अनधिकृत घरावर सोमवारी (दि.१६) म्हाडाकडून थेट तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काही महिन्यांपूर्वी विक्रोळी येथील टागोर नगर परिसरात ड्रग्स आणि गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कारवाई करत काही संशयितांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्या वेळी ‘तसू’ या व्यक्तीचे नाव समोर आले होते. तसेच संबंधित व्यक्तीने विक्रोळी पोलीस ठाणे येथे जाऊन राडा घातल्याचीही घटना घडली होती.

या पार्श्वभूमीवर आज म्हाडाने संबंधित व्यक्तीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवत कारवाई केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT