Mumbai Rain
मुंबईत पावसाची बॅटींग! विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलल्या  File Photo
मुंबई

Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलल्या

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासांत पावसाची जोरदार बॅटींग सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज ८ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा पुढा ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे की सेंटर ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग सेंटरच्या सर्व परीक्षा सोमवार, 8 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नियोजित होत्या. परंतु गेल्या २४ तासांहून अधिक काळ मुंबईतील बहुतांशी परिसरात मुसळधार सुरू आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT