मुंबई : मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मधील काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसेच जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगर तसेच पालघर जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी वेगाने वारे वाहत होते. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगर तसेच पालघर जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी वेगाने वारे वाहत होते. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील ४८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. तसेच एक-दोन वेळा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
१ ऑक्टोबर रोजी मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यामध्येही हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यानंतरच्या दिवसांतही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तापमानातील चढ-उतार कायम
गेले काही दिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये बुधवारी कमाल २५ आणि किमान ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी (२६/३२ अंश सेल्सिअस) किमान तापमानात थोडी वाढ अपेक्षित आहे. शुक्रवारपासून तापमानात (२७/३४ अंश सेल्सिअस) आणखी वाढ होईल. वीकेंडला पारा पस्तीशीच्या घरात जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.