मुंबई

मुंबई : सीजीएसटीच्या अधीक्षकाला पाच लाखांची लाच घेताना सीबीआयकडून अटक

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ३० लाखांची मागणी करुन लाचेचा पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेड्या ठोकल्या. हेमंतकुमार असे या अधीक्षकाचे नाव असून त्याच्या घर आणि कार्यालयाच्या झडतीमध्ये सीबीआयला ४२.७० लाख रुपयांची रोख रक्कम आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत.

सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयातील अधीक्षक हेमंतकुमार हा कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल झाली. त्यानुसार सीबीआयने केलेल्या तपासात हेमंतकुमार याने १५ लाखांची मागणी करुन तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून हेमंतकुमार याला अटक केली.

सीबीआयने हेमंतकुमार याच्या मुंबई, गाझियाबाद येथील कार्यालयात आणि निवासी जागेवर झडती घेतली असता त्यांना ४२.७० लाख रुपयांची रोख रक्कम, जंगम/अचल मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य महत्वपूर्ण दस्तऐवज सापडला. सीबीआयने हा ऐवज जप्त करुन हेमंतकुमार याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT