वकील कृपा याज्ञिक यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली  Pudhari
मुंबई

Prasad Vedpathak Case | सफेद पट्टी वादानंतर प्रसाद वेदपाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वकील कृपा राजेश याज्ञिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Safed Patti Controversy

घाटकोपर : सफेद पट्टी प्रकरणामुळे चर्चेत आलेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या राहत्या सोसायटीतील रहिवासी आणि वकील कृपा राजेश याज्ञिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील एका सोसायटीमध्ये जैन कुटुंबांनी परिसरात पांढऱ्या पट्ट्या मारल्याच्या मुद्द्यावरून वेदपाठक यांनी आक्षेप घेतला होता. या घटनेनंतर सोशल मीडियासह विविध स्तरांवर मोठी चर्चा रंगली होती.

दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष यांच्या कन्या असलेल्या कृपा याज्ञिक यांनी वेदपाठक यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या मतांचा विरोध केल्याच्या कारणावरून वेदपाठक यांनी शिवीगाळ केली तसेच धमकी दिल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

या तक्रारीच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७९ आणि ३५१(४) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार कृपा याज्ञिक यांनी केली आहे. दरम्यान, सफेद पट्टी वाद प्रकरण शांत होत असतानाच नव्या गुन्हा नोंदणीमुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT