Mumbai Rains
मुंबईत पाऊस पुन्हा सक्रिय file photo
मुंबई

Mumbai Rains : मुंबईत पाऊस पुन्हा सक्रिय; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल उशिरा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा मुंबईत (Mumbai Rains) हजेरी लावली असून शहर विभागात १२ तासात सर्वाधिक पाऊस पडला. पश्चिम व पूर्व उपनगरात पावसाचा फारसा जोर नाही. पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल काही तांत्रिक कारणामुळे १० ते १५ मिनिटे उशिरा धावत आहेत.

बुधवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस (Mumbai Rains) सुरू झाला असून मध्यरात्री दक्षिण मुंबई व मध्य मुंबईत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे सकल भागात काही ठिकाणी पाणी तुंबले होते. मात्र पाण्याचा तातडीने निचरा करण्यात आला. गेल्या बारा तासात शहरात सुमारे ८३ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात ४५ मिमी तर पश्चिम उपनगरात ३९ मिमी पावसाची नोंद झाली. चार ते पाच ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. शहराच्या काही भागात सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र शहरातील जनजीवन सुरळीत सुरू आहे.

SCROLL FOR NEXT