मुंबई : मुंबईत पाऊस सक्रिय झाला आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 16.51 टक्के पाऊस झाला आहे. उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक 19.37 टक्के पावसाची नोंद झाली. तर पूर्व व पश्चिम उपनगरात 14.81 टक्के पाऊस झाला आहे.
मुंबई शहर व उपनगरात बुधवार मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून मोठ्या सरी पडत होत्या. बुधवारी सकाळी 8 ते गुरुवार सकाळी 8 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला. यात नरिमन पॉईंट येथे 156 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे 144 व मुंबई महापालिका मुख्यालय परिसरात 126 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मुंबई शहरात वार्षिक सरासरी 2,095 मिमी तर उपरागरात 2,319 मिमी पाऊस होतो. मात्र यावेळी मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे वेधशाळेने नोंद केल्यानुसार शहरात 294 मिमी तर उपनगरात 166 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई महानगरपालिकेने नोंदनुसार शहरात 405 मिमी, पूर्व उपनगरात 343 मिमी व पश्चिम उपनगरात 343 मिमी पाऊस पडला.
शहर : 4.98 मिमी
पूर्व उपनगर : 14.39 मिमी
पश्चिम उपनगर : 17.26 मिमी
सकाळी : 7.09 वाजता
लाटांची उंची : 3.52 मीटर
सायंकाळी : 6.37 वाजता
लाटांची उंची : 3.82 मीटर
गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून पडणार्या मोठ्या सरीमुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले होते.
मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकलही पावसाळी वातावरणामुळे 5 ते 10 मिनिट विलंबाने धावत होत्या.
सर्व उपनगरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली होती.
दिवसभरात वीस पेक्षा जास्त ठिकाणी झाडांच्या फांद्यावर झाडे पडली. तर सुमारे 8 ठिकाणी घरांच्या भिंती व घरे पडली.
शॉर्टसर्किटच्याही पाच ठिकाणी किरकोळ घटना घडल्या.