मुंबई

मुंबई : जुहू चौपाटीवर पाऊस; गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या तरुणाचा वीज पडून मृत्यू

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. घोषित केले. हसन युसुफ शेख (16 वर्षे) असे तरुणाचे नाव आहे.

अनंत चतुर्दशीमुळे मुंबईतील चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. गणेशोत्सवासाठी तैनात असलेल्या तरुणावर वीज पडली. या दुर्घटनेत प्रकृती गंभीर असल्याने तरुणाला विले पार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषीत केले.

SCROLL FOR NEXT