मुंबई/पुणे : देशातील महानगरे आणि निमशहरांमध्ये तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार होत आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत मुंबई आणि पुण्यातील ७२ लाख चौरस फूट जागांचे भाडेकरार झाले आहेत. महानगरांमध्ये मुंबई देशात दुसऱ्या आणि पुणे चौथ्या स्थानी आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामुळे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची (जीसीसी) मागणी वाढली आहे. पुणे आणि मुंबईला बहुतांश कंपन्यांकडून मागणी असल्याचे दिसून येत आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यात ३२ लाख चौरस फूट कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले. त्यात ४२ टक्के वाटा अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्राचा आहे. खालोखाल २५ टक्के वाटा जीसीसीचा आहे. तर, तंत्रज्ञान कंपन्यांनी १५ टक्के जागा व्यापली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुण्यातील कार्यालयीन जागांच्या भाडेकरारात तब्बल ६८.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीबीआरई इंडियाच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
देशात बेंगळुरू आघाडीवर असून, ४३ लाख चौरस फूट कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले. त्यात तंत्रज्ञान कंपन्या २७ टक्के, एफएमसीजी रिटेल २३ टक्के, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा १४ टक्के आहे. आर्थिक राजधानी मुंबई दुसऱ्या स्थानी असून, ४० लाख चौरस फुटांच्या कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले. त्यात मिश्र स्वरूपाच्या कार्यालयांचा वाटा ३५ टक्के असून, तंत्रज्ञान १५ आणि विमा, बँकिंग, वित्तसंस्थांचा वाटा १५ टक्के आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान बेंगळुरूत
या क्षेत्रांचा वरचष्मा...
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशातील कार्यालयीन जागांच्या व्यवहाराचा आकडा ५ कोटी ९६ लाख चौरस फुटांवर गेला आहे. त्यातील ६० टक्के वाटा तंत्रज्ञान, विमा, बँकिंग आणि वित्तीय संस्था आणि मिश्र स्वरूपाच्या जागांचा आहे. ग्लोबल कपॅबिलिटी सेंटरचा (जीसीसी) वाटा ३९ टक्के आहे. देशातील एकूण जीसीसीपैकी ६७ टक्के जीसीसी बेंगळुरू, पुणे आणि दिल्लीत आहेत.
दीड कोटी चौरस फुटांचे व्यवहार झाले. मुंबईत १ कोटी ६ लाख चौरस फुटांचे आणि नवी दिल्लीत १ कोटी २ लाख चौरस फुटांच्या कार्यालयांचे भाडेकरार झाले. गत नऊ महिन्यांत देशभरात झालेल्या कार्यालयीन भाडेकरारांपैकी ६१ टक्के व्यवहार या तीन महानगरांत झाले आहेत. जीसीसीमध्ये गुंतवणूक करण्यात अमेरिकन संस्था आघाडीवर आहेत. खालोखाल युरोप, मध्यपूर्वेतील देश आणि एशिया पॅसिफिक प्रांतांतील देशांचा क्रमांक असल्याचे सीबीआरई इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.
या क्षेत्रांचा वरचष्मा...
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशातील कार्यालयीन जागांच्या व्यवहाराचा आकडा ५ कोटी ९६ लाख चौरस फुटांवर गेला आहे. त्यातील ६० टक्के वाटा तंत्रज्ञान, विमा, बँकिंग आणि वित्तीय संस्था आणि मिश्र स्वरूपाच्या जागांचा आहे. ग्लोबल कर्पोबलिटी सेंटरचा (जीसीसी) वाटा ३९ टक्के आहे. देशातील एकूण जीसीसीपैकी ६७ टक्के जीसीसी बेंगळुरू, पुणे आणि दिल्लीत आहेत.