Missing Link Project Pudhari
मुंबई

Missing Link Project: मुंबई-पुणे मिसिंग लिंक अखेर पूर्ण; महाराष्ट्र दिनी लोकार्पण

Mumbai Pune travel time reduction: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खोपोलीत सोहळा; प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी करणारा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वास पोहोचला असून, येत्या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लिंकची पाहणी करतील.

मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून अर्धा तास वेळ, तसेच इंधनाची बचत होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे अंतर 13.3 किलोमीटर आहे. बोरघाटातील तीव्र वळणे आणि चढ-उतार यामुळे टाळता येतील. प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा एकूण 94.5 किमी लांबीचा रस्ता आहे. द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 4 हे दोन्ही रस्ते खालापूर टोल प्लाझा येथे एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

त्यामुळे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट या भागात 13 किमीचा मिसिंग लिंक उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) करण्यात आले आहे. मिसिंग लिंक उभारण्याचे काम 2019 साली सुरू करण्यात आले होते. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर हे काम पूर्ण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT