BMC  pudhari photo
मुंबई

BMC public toilets : सार्वजनिक शौचालयांत मुलांसाठी मूत्रपात्रे बंधनकारक!

महापालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर; मोठ्यांसोबत फिरणाऱ्या मुलांची गैरसोय होणार दूर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयामध्ये मुलांसाठी लहान मूत्रपात्रे बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजूर झाला असून तो महापालिका आयुक्तांकडे पुढील अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई या मोहिमेंतर्गत महापालिकेतर्फे सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु सार्वजनिक शौचालयाच्या रचनेमध्ये लहान मुलांसाठी मूत्रपात्रे बसवण्यात येत नाहीत. त्यामुळे लहान मुलांना शौचालयातील मूत्रपात्राचा वापर करणे शक्य होत नाही.

मुंबईतील बहुतांश सार्वजनिक शौचालयामध्ये मोठ्या व्यक्तींसाठी मूत्रपात्रे बनवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांना शौचालयाच्या बाजूला उघड्यावर लघवी करावी लागते. त्यामुळे स्वच्छ मुंबईचा उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे यापुढे नवीन सार्वजनिक शौचालय बांधताना मुलांचा व कमी उंचीच्या व्यक्तींचा विचार होणे आवश्यक असल्याकडे मुंबई महानगरपालिका सभागृहाने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

मुंबईत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयामध्ये लहान मुलांसाठी मूत्रपात्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही मूत्रपात्रे प्रत्येक शौचालयामध्ये बसवण्यात येतील. ही संख्या एक किंवा दोन इतकी असेल असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

  • महापालिका सभागृहात सार्वजनिक शौचालयात यापुढे लहान मुलांसाठी छोटे मूत्रपात्र बसवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

  • हा ठराव आता पुढील अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान या उपक्रमाचे महापालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागाने स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT