मुंबई महानगरपालिका (Pudhari Photo)
मुंबई

Mumbai Prabhag Rachana Objections: मुंबई प्रभाग रचनेवर सुमारे 410 हरकती

6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • २०१७ आणि २०२२ मध्येही मोठ्या प्रमाणावर हरकती

  • सन २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग रचनेवर ६१३ हरकती व सूचना नोंदल्या गेल्या होत्या.

  • २०२२ मध्ये २३६ प्रभाग रचनेवर ८९२ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या.

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार याची सर्वच राजकीय पक्ष, माजी नगरसेवक आणि नागरिकांनाही प्रतीक्षा आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना व त्यासंबंधी वेळापत्रक निवडणूक आयोगाने तयार केल्याने अखेर निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.

महापालिकेने २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. या कालावधीत सायंकाळपर्यंत एकूण ४१० हरकती आणि सूचनांची नोंद झाली. यात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

महापालिकेने हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन केल्यानंतर २२ ते ३० ऑगस्ट या नऊ दिवसांत फक्त १७ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. मात्र ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या अवघ्या चार दिवसांत १५४ हरकती व सूचना दाखल झाल्या. तर शेवटच्या दिवशी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंतच ३५६ हरकती व सूचनांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्येत झपाट्याने वाढ झाली असून या पाच दिवसांत मिळून तब्बल ३९३ हरकती व सूचना नोंद झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी महापालिकेचे माजी आयुक्त तथा वरिष्ठ सनदी अधिकारी इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT