Powai  Typing test
मुंबई : पवई येथे टंकलेखन परीक्षेत गोंधळ उडाला. Pudhari News Network
मुंबई

मुंबई : पवई येथे टंकलेखन परीक्षेत गोंधळ; परीक्षार्थींचा संताप

पुढारी वृत्तसेवा

पवई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या पवई विभागात टीसीएस आयऑन डिजीटील पार्क मध्ये सोमवार दि १ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींचा मोठा गोंधळ झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची लिपिक पदासाठीची टंकलेखन चाचणी परीक्षा १ जुलै ते १३ जुलै दरम्यान होणार आहे. सुमारे २० हजार च्या आसपास परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

मात्र, सोमवार च्या पहिल्या बॅच ची परीक्षा सुरू असताना सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाड झाला.टायपिंग केल्यांनंतर सबमिशन होत नसल्याने पहिल्याच बॅच च्या परीक्षार्थींची भंबेरी उडाली. परीक्षेला उशीर होऊ लागल्याने बाहेर दुसऱ्या बॅच च्या विद्यार्थ्यांना ही उशीर होऊ लागला. या मुळे गोंधळ होऊ लागला. शेकडो परीक्षार्थी या केंद्राच्या प्रवेशद्वारावर जमले. घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस या सेंटर वर दाखल झाले. ते परीक्षार्थीनी सहकार्य करावे म्हणून विनंती करू लागले. मात्र परीक्षार्थींमध्ये संताप वाढत होता.

मात्र, सॉफ्टवेअर चालेच ना, म्हणून १ आणि २ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी आले होते. मात्र याची गंभीर दखल घेण्याची मागणी परीक्षार्थिनी केली आहे.तसेच सदर परीक्षा दोन दिवस मध्ये असलेल्या सुट्टीत किंवा सलग १४ , १५ तारखेला घेण्याची मागणी केली आहे. अश्या परीक्षा हा जिल्हानिहाय घेण्यात याव्यात अशी मागणी ही करण्यात आली आहे. गेले दोन दिवस या परीक्षेसाठी परीक्षार्थी गावखेड्यातून आले असून वारंवार परीक्षांमध्ये असे गोंधळ होत असल्याने या परीक्षार्थिनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT