मुंबई : राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) जाहीर केले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेचा कालावधी काही दिवस अलीकडे घेण्यात आला आहे.
त्यामुळे या पूर्वी 30 जून रोजी प्रसिद्ध होणारी प्राथमिक गुणवत्ता यादी आता 28 जूनला प्रसिद्ध होणार असून अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलै ऐवजी 1 जुलैला प्रसिद्ध होईल. त्यामुळे पहिली फेरी 9 जुलैऐवजी 7 जुलैपासून सुरू होणार आहे.
राज्यात आयटीआय प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया 15 मे पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 26 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेत दोन लाखांवर अर्ज दाखल झाले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून, सायं. 5 वाजेपर्यंत
प्रवेश अर्ज निश्चित करण्याची मुदत : 27 जून, सायं. 5 वाजेपर्यंत
पसंतीक्रम / प्राधान्य सादर करणे : 28 जून, सायं. 5 वाजेपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी : 28 जून, सायं. 5.30 वाजता
हरकती सादर करण्याची मुदत : 30 जून, सायं. 5 वाजेपर्यंत
अंतिम गुणवत्ता यादी : 1 जुलै, सायं. 5 वाजता
पहिली प्रवेश यादी : 7 जुलै
प्रत्यक्ष प्रवेश (प्रथम फेरी) : 8 ते 12 जुलै, सायं. 5 वाजेपर्यंत
दुसरी प्रवेश फेरी : 27 ते 22 जुलै
तिसरी प्रवेश फेरी : 27 जुलै ते 1 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी : 6 ते 10 ऑगस्ट
संस्था स्तरावर समुपदेशन फेरी : 11 ऑगस्ट