मुंबई

सहा महिन्यांत प्लास्टिक बंदीतून मुंबई पालिकेने कमविले ४१.५० लाख!

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत १ जुलै २०२२ पासून सुरु झालेल्या प्लास्टिक बंदीच्या कारवाई दरम्यान मुंबई महापालिकेने ६ महिन्यांत ४,०८०.६०८ किलो प्लस्टिक जप्तीतून ४१ लाख ५० हजार रुपयांचा दंडात्मक महसूल जमा केला. या कारवाईची आतापर्यंत ८३० प्रकरणे झाली. तर आय. आर २० आणि भेटीची संख्या १ लाख १२ हजार २१२ झाल्याची माहिती महापालिकेतील विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार मुंबई महापालिकेकडून प्लस्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी फेरीवाले, दुकानदार आणि इतर आस्थापने यांच्यावर पालिकेकडून धाडी टाकून प्लस्टिक जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कारवाईसाठी महापालिकेतील दुकाने व आस्थापन विभाग, अनुज्ञापन विभाग, बाजार खाते आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक मुंबई शहरासह पश्चिम व पूर्व उपनगरांत दंडात्मक कारवाईसाठी कार्यरत आहे.

या पथकांकडून भाजी मार्केट, पालिकेच्या मंडड्या, फेरिवाले दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर आस्थापने यांच्या ठिकाणी धाड टाकून प्लास्टिक हस्तगत केले जाते तसेच त्यांना जागेवर दंडही आकारला जातो. असे विशेष उपायुक्त संजोग‍ कबरे यांनी सांगितले. २३ जानेवार रोजी दुकाने व आस्थापना विभागाने ६. ३ प्लस्टिक जप्त करून ३० हजार रूपयाचा दंड वसूल केला. यासाठी त्यांना ६६८ ठिकाणी भेटी द्याव्या लागल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT