मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होणार असून शुक्रवारी (16 जानेवारी) रोजी दुसऱ्या दिवशीच मतमोजणी होणार आहे.
याचीही तयारीही पूर्ण झाली मुंबईत 23 ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. या प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये 8 ते 10 प्रभागातील मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. मतदान पार पडल्यानंतर त्या त्या मतदार संघातील मतपेटी मतमोजणी केंद्रावर नेल्या जाणार आहेत. त्यानंतर या पेट्या पोलीस सुरक्षेमध्ये ठेवल्या जाणार आहेत.
प्रभाग 1 ते 8 : रुस्तमजी संकूल, दहिसर (पश्चिम)
प्रभाग 9 ते 18 : नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, बोरीवली (पूर्व)
प्रभाग 19 ते 31 : पालिका शाळा, बजाज मार्ग, कांदिवली (पश्चिम)
प्रभाग 32 ते 35 व 46 ते 49 : मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई), मालाड (पश्चिम)
प्रभाग 36 ते 45 : कुरार गाव, मुंबई पब्लिक स्कूल संकुल, मालाड (पूर्व)
प्रभाग 50 ते 58 : महानगरपालिका शाळा, उन्नत नगर, गोरेगाव (पश्चिम)
प्रभाग 59 ते 71 : शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी (पश्चिम)
प्रभाग 72 ते 79 तसेच 80,81, 86 : गुंदवली महानगरपालिका शाळा, अंधेरी (पूर्व)
प्रभाग 82 ते 85 व 97 ते 102 : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, सांताक्रुझ (पश्चिम)
प्रभाग 87 ते 96 : प्रभात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन इमारत, सांताक्रुझ (पूर्व)
प्रभाग 103 ते 108 व 109, 110, 113 आणि 114, बॅडमिंटन कोर्ट, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल, मुलुंड (पश्चिम).
प्रभाग 111, 112, 115 ते 122 : सेंट झेवियर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कांजूरमार्ग (पश्चिम)
प्रभाग 123 ते 133, पंतनगर महापालिका शाळा क्रमांक 03, घाटकोपर (पूर्व)
प्रभाग क्रमांक 145 ते 148 व 149 ते 155, कलेक्टर कॉलनी, महानगरपालिका शाळा संकुल, शिवशक्ती नगर, चेंबूर
प्रभाग 134 ते 144 : तळमजला, महानगरपालिका प्रसुतीगृह व रुग्णालय (नवीन इमारत), लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द
प्रभाग 156 ते 162 आणि 164, नेहरू नगर महानगरपालिका शाळा, कुर्ला (पूर्व)
प्रभाग 163, 165 ते 171 : महानगरपालिका शाळा , नेहरु नगर, कुर्ला (पूर्व),
प्रभाग 172 ते 181 : नवीन महानगरपालिका शाळा, जैन सोसायटी, सायन (पूर्व)
प्रभाग 182 ते 192 : डॉ. ऍन्टोनियो दा सिल्या हायस्कूल, कबुतरखाना जवळ, दादर (पश्चिम)
प्रभाग 193 ते 199 : वरळी अभियांत्रिकी संकुल, तळमजला, वरळी
प्रभाग 200 ते 206 : पहिला मजला, पोलीस संकुल हॉल, दादर, नायगाव.
प्रभाग 214 ते 219 व 220 ते 222 : विल्सन महाविद्यालय, गिरगाव चौपाटी, सीफेस रोड.
प्रभाग 207 ते 213 तसेच 223, 224 आणि 225 ते 227 : सर जे. जे. रोड, व्ह्युम हायस्कुल शेजारी, भायखळा.