BMC Teacher Recruitment Pudhari
मुंबई

BMC Teacher Recruitment: मुंबई महापालिका शाळांमध्ये ९३५ शिक्षण सेवकांची भरती; ११ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

मराठी माध्यमासाठी ५२५ शिक्षक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण सेवकांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९३५ पदे भरण्यात येणार असून यासाठी मासिक १६ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी ६ ते ११ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. विशेष म्हणजे चित्रकला व संगीत संवर्गामध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे शक्य होत नाही.

त्यामुळे शिक्षण विभागाने मराठी माध्यमासाठी सर्वाधिक ५२५ शिक्षण सेवक ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय इंग्रजी माध्यमासाठी ३५२, चित्रकला संवर्गासाठी १० व संगीत संवर्गासाठी ४८ शिक्षण सेवक भरण्यात येणार आहेत.

सरळ सेवेतून भरण्यात येणाऱ्या या पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती आदी बाबतच्या सविस्तर माहितीसाठी व अन्य महत्त्वाच्या सूचनांसाठी मुंबई महापालिकेच्या https://portal. https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

खुल्या प्रवर्गासाठी २०१ पदे

मराठी माध्यमाच्या शिक्षण सेवक भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी २०१ पदे व इंग्रजी माध्यमासाठी १२९ पदे आहेत. तर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अन्य आरक्षणांमध्ये काही पदे आहेत.

यात अनुसूचित जाती ७२, अनुसूचित जमाती ४९, ओबीसी १६१ पदांचा समावेश आहे तर अन्य पदे अन्य जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असून माजी सैनिक १५ टक्के, प्रकल्पग्रस्त ५ टक्के, खेळाडू ५ टक्के, पदवीधर सुशिक्षित बेरोजगार १० टक्के, अनाथ मुलांसाठी १ टक्का व भूकंपग्रस्तांसाठी २ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT