Mumbai Crime News file photo
मुंबई

Mumbai Crime News: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; दोन नराधमांना अटक

टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Crime News

मुंबई: मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने टिळक नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दिली. मुलीने दिलेल्या जबाबानुसार, दोन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीची तातडीने दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT