Crime News pudhari photo
मुंबई

MHADA house fraud Mumbai : म्हाडाच्या घरासह गाळ्याच्या आमिषाने तिघांची ६४ लाखांची फसवणूक

मुंबई विद्यापीठातील घटना; मुख्य आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : म्हाडाच्या स्वस्तातील घरासह गाळ्याच्या आमिषाने मुंबई विद्यापीठाच्या एका कर्मचार्‍यासह दोन भावांची ६४ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी स्वर्णसिंह तुफानसिंह पटीयाल ऊर्फ बंटी या मुख्य आरोपीविरुद्ध गुुन्हा दाखल केला.

तकारदार कालिना येथील मुंबई विद्यापीठात चालक म्हणून काम करत असून तिथेच असलेल्या स्टाफ वसाहतीत राहतात. त्यांचा भाऊ साकिनाका येथे राहत असून तिथे स्वर्णसिंह राहतो. गेल्या सहा वर्षांपासून तक्रारदार त्याला ओळखतात. तेरा वर्षांपूर्वी ते त्यांच्या भावाकडे गणपती सणानिमित्त गेले होते.

यावेळी स्वर्णसिंहने त्यांना कुर्ला, कमानी येथे स्वस्तात घर मिळत असल्याचे सांगितले. तिथे त्यांना म्हाडाचे घर आणि गाळा देण्याचे आमिष दाखविले होते. आपली म्हाडामध्ये चांगली ओळख असून त्यांना म्हाडाचे स्वस्तात घर देतो असे सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तक्रारदारासह त्यांच्या मित्राने व त्याच्या भावाने पाच घरासह दोन गाळ्यासाठी अर्ज केला होता.

२०१७ साली तो त्यांना घेऊन मंत्रालयात आला होता. तिथेच त्याने त्यांना घराच्या चाव्या दिल्या. लॉटरी लागल्यानंतर त्यांना घराचे ॲलॉटमेंट लेटर दिले जाईल. त्यानंतर त्यांनी घराचा ताबा घ्यावा असे सांगितले. २०२० पर्यंत तक्रारदाराने त्यांच्या दोन घरासह दोन गाळ्यासाठी ३१ लाख ५ हजार तर त्यांच्या मित्राने स्वर्णसिंहला दोन घरासाठी २२ लाख ७८ हजार ३०० रुपये रोख व ऑनलाईनने दिले होते.

याच दरम्यान मित्राच्या भावाने त्याला आणखीन १० लाख ३५ हजार २१० रुपये कॅश स्वरुपात दिले होते. अशा प्रकारे या तिघांनी त्याला टप्याटप्याने ६४ लाख १८ हजार ५१० रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र पेमेंट करुनही त्याने २०२४ पर्यंत त्यांना घरासह गाळ्याचा ताबा दिला नाही. काही दिवसांनी त्याने पुर्नविकास योजनेतील घराचे ॲलॉटमेंट लेटर दिले, मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर त्याने दिलेले घराचे लेटर बोगस असल्याचे उघडकीस आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT