मुंबई : मंडाळे ते डायमंड गार्डन दरम्यान असलेली स्थानकेही तयार झाली आहेत. pudhari photo
मुंबई

Mandale to Diamond Garden metro : महिनाअखेर मंडाळे ते डायमंड गार्डन मेट्रो सुरू होणार

अंतिम सुरक्षा चाचणीस सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : डीएननगर ते मंडाळे मेट्रो 2 ब मार्गिकेचा पहिला टप्पा महिनाअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून मंडाळे ते डायमंड गार्डन मार्गिकेच्या सीएमआरएसने सुरक्षा चाचणीला सुरुवात केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास मेट्रो सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला जातो. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज सहा डब्यांची मेट्रो गाडी या मार्गिकेवर धावणार आहे.

मेट्रो 2 ब ही 23.64 किमीची मार्गिका आहे. यात एकूण 20 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द व मंडाळे डेपो ही स्थानके आहेत.पहिला टप्पा जून 2025 पर्यंत तर दुसरा टप्पा डिसेंबर 2025पर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र ऑगस्ट संपला तरीही या मार्गिकेवर मेट्रो धावू शकलेली नाही.

या मार्गिकेवर मेट्रोची पहिली चाचणी 15 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यानंतर 2 ते 4 जुलै दरम्यान सीएमआरएसने प्राथमिक तपासणी केली होती. त्यांनी मेट्रोच्या कामासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आता सीएमआरएसकडून अंतिम चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरीस मेट्रो 2 ब धावेल असा अंदाज आहे.

पूर्व व पश्चिम उपनगरे या मेट्रोने जोडणार

ही मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो मार्गाने जोडले जातील. तसेच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मेट्रो 1, मेट्रो 2 अ, मेट्रो 3, मेट्रो 4 अशा विविध ठिकाणांना जोडणी मिळेल. नव्या मेट्रो मार्गिकेमुळे पूर्व व पश्चिम उपनगरे जोडली जातील. ही मार्गिका सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT