Mumbai Methanol Inspection Pudhari
मुंबई

Mumbai Methanol Inspection: मिथेनॉल खरेदीदारांवर उत्पादन शुल्कचा डोळा

गेल्या दोन दिवसांत 40 ठिकाणी अवैध दारू प्रकरणात कारवाई करण्यात आल्याचे मुंबई शहर उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू घटनेनंतर दक्षता म्हणून मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरात मिथेनॉल खरेदीदारांची तपासणी हाती घेतली आहे. काही उद्योगाकडून मिथेनॉल विकत घेतले जाते.

अशा उद्योगांकडून मिथेनॉलचा योग्य वापर केला जात असल्याची खातरजमा केली जात आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत 40 ठिकाणी अवैध दारू प्रकरणात कारवाई करण्यात आल्याचे मुंबई शहर उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी सांगितले.

एफडीएकडून मिथेनॉलचा अवैध साठा जप्त केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागानेही आपल्या तपासाचे चक्र शहरात मिथेनॉल विकत घेणाऱ्याकडे वळवले आहे. जवळपास दहा उद्योगांनी खरेदी केलेले मिथेनॉल नक्की कोणत्या कारणांसाठी वापरले याची तपासणी करण्यात आली आहे.

यामध्ये फेविकॉल बनवणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. मिथेनॉल विकत घेणारे आणि त्यांना मिथेनॉल पुरवणारे याची तपासणी होत आहे. मुंबईत पूर्वी आरे कॉलनी, वडाळा, वांद्रे आणि धारावी येथे मोठ्या प्रमाणत देशी दारूसाठी हातभट्टी लावली जात होती. मात्र उत्पादन शुल्क विभागाने वारंवार कारवाई करून शहरातील दारूचा हातभट्टी व्यवसाय नष्ट केला आहे.

3 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मित, वाहतूक आणि विक्रीच्या गेल्या दोन दिवसांत 40 ठिकाणी धाडी घालत 3 लाखांचा माल जप्त केला. अवैध मार्गाने दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT