Mumbai Railway Megablock Pudhari
मुंबई

Mumbai Local Megablock: उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईकरांनो, प्रवासाला घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहा!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, (४ ऑक्टोबर) रोजी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 'अप' व 'डाऊन' धीम्या मार्गांवर, हार्बर मार्गात पनवेल ते वाशी दरम्यान 'अप' व 'डाऊन' मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मुख्य मार्गात बोरीवली ते राम मंदिर दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील ब्लॉक

सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 'अप' व 'डाऊन' धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन' धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील.

या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार व सीएसएमटी स्थानकांदरम्यान 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते राम मंदिरदरम्यान सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत म्हणजे चार तास अप फास्ट व पाचव्या मार्गावर जम्बो ब्लॉक असणार आहे.

हार्बर रेल्वेवरील ब्लॉक

पनवेल व वाशी स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' हार्बर मार्ग सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत सीएसएमटी येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर लाईनवरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या सेवा रद्द राहतील.

तर ट्रान्स-हार्बर लाईनवर पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या (अप) सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत व ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत रद्द राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT