‘शिवतीर्था‌’वर आयोजित संयुक्त सभेत बोलताना जयंत पाटील.  Pudhari photo
मुंबई

BMC election 2026 |"मुंबईचा महापौर ठाकरे बंधूच ठरवतील" : जयंत पाटील

राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राला आनंद

पुढारी वृत्तसेवा

raj-uddhav thackeray joint rally

मुंबई : "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, हे पाहून मुंबईकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनापासून आनंद झाला आहे. दोन भाऊ एकत्र येणे ही राज्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची तुम्हाला पूर्ण साथ आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा महापौर कोण असेल, हे दोन्ही ठाकरे बंधूच ठरवतील," असा विश्‍वास राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आज (दि.११) व्‍यक्‍त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांनी ‘शिवतीर्था‌’वर आयोजित केलेल्‍या संयुक्त सभा ते बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या मैत्रीची आठवण

यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "जेव्हा शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा शरद पवारांनी कट्ट्यावर बसून ती सभा ऐकली होती. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष वेगळे असले तरी मराठी माणसाच्या हितासाठी ते नेहमीच एकत्र आले."

विरोधकांना 'सुरत'वरून टोला

"छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, याचा राग अनेकांच्या मनात आजही आहे," असा टोला त्यांनी लगावला. जेव्हा जेव्हा मुंबईतील भूमिपुत्र अडचणीत असतो, तेव्हा त्याला ठाकरे कुटुंबाचीच आठवण येते, असेही त्‍यांनी नमूद केले. "राष्ट्रवादी काँग्रेसची तुम्हाला पूर्ण साथ आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा महापौर कोण असेल, हे दोन्ही ठाकरे बंधूच ठरवतील," असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT