विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ इमारतीला भीषण आग 
मुंबई

Mumbai building fire| विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ इमारतीला भीषण आग

तासाभरात आगीने धारण केले रुद्ररूप

पुढारी वृत्तसेवा

घाटकोपर : मुंबईमध्ये रविवारी (दि.८) रात्री मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना समोर आल्या. विद्याविहार रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायलाईन विहार या इमारतीला काल (रविवारी) रात्री ११ च्या दरम्यान आग लागली. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यांना ही आग लागली. आग वरून खाली एक एक माळा वाढत गेली तासाभरात आगीने रुद्ररूप धारण केले.

घटनास्थळी तासाभराने अग्निशमन दल दाखल झाले. त्यांचा आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रात्री सुरू होता. रविवार सुट्टी असल्याने या कमर्शियल इमारतीमध्ये कोणी असण्याची शक्यता कमी आहे. आगीने संपूर्ण तीन मजले जळून खाक झाले. आगीचे कारण समोर आलेले नाही, मुंबईत रात्री ठिकठिकाणी आगीचे असे तांडव मात्र पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT