मुंबई : साहित्य आणि नाट्यक्षेत्रात अग्रणी असलेली मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणूकीचा अधिकृत निकाल येत्या गुरूवारपर्यंत ( दि. 25) रोजी जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशोधन दिवेकर यांनी दिली.
१९३५ मध्ये स्थापन झालेल्या मुंबई मराठी साहित्य संघ याने गेली ९० वर्षे महाराष्ट्राच्या साहित्य आणि नाट्य वर्तुळात भरीव योगदान दिले आहे. १५ वर्षानंतर या संघाची निवडणूक १७ सप्टेंबर रोजी झाली. या निवडणूकीत ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांचे भालेराव विचार मंच तर ज्येष्ठ लेखिका डॉ. उषा तांबे यांचे उर्जा पॅनेल निवडणूक रिंगणात होते. भालेराव विचार मंच हा भारतीय जनता पक्षाचे मंत्री मंगलप्रभात लोढा पुरस्कृत असल्याची तर मुंबई मराठी साहित्य संघाच्या जागेच्या पुर्नविकासात रस असल्याने लोढा यांनी या निवडणूकीत उडी घेतल्याची चर्चा होती.
लोढा हे या संघाचे सदस्य आहेत, तर उषा तांबे या अनेक वर्षांपासून संघात पदे भूषवत आहेत, त्यांनी उतारवयात नव्या उमेदवारांना संधी देतील अशी आशा साहित्य संघ आणि डॉ. तांबे यांच्या समवेत साहित्य वर्तुळात कार्यरत असलेल्या निकटवर्तियांची होती. मात्र या वयातही डॉ. तांबे संघावरील आपला हक्क सोडायला तयार नसल्याने त्यांच्या निकटवर्तियांनी संघाच्या निवडणूकीत वेगळी चूल मांडल्याने ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली. राजकीय नेत्यांचा अमल असणार्या संस्थाइतकीच मुंबई मराठी साहित्य
संघाची निवडणूक गेल्या महिनाभरापासून गाजते आहे. केवळ मुंबईच्या नाही तर राज्याच्या साहित्य नाही तर नाट्य वर्तुळात गेली ९० वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेची निवडणूकीतील अभिनेते प्रमोद पवार यांचे भालेराव विचार मंच आणि प्रा. उषा तांबे यांच्या नेतृत्वाखालील ऊर्जा पॅनेल रिंगणात होते. ३५ सदस्यांच्या नियामक मंडळात १२ सदस्यांची कार्यकारिणी आहे.
अध्यक्ष : ऊर्जा पॅनल - डॉ उषा तांबे,
उपाध्यक्ष - ७ पदे
ऊर्जा पॅनल - विजय केंकरे, अशोक कोठावळे, रेखा नार्वेकर, डॉ अनिल बांदिवडेकर, सुदेश हिंगलासपुरकर
भालेराव विचार मंच पॅनल - जयराज साळगांवकर, मधुकर वर्तक
नियामक मंडळ ३५ पदे :
उर्जा पॅनल - डॉ अश्विनी भालेराव गांधी, ज्ञानेश पेंढारकर, डॉ. अमेय पुरंदरे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, मोनिका गजेंद्रगडकर, चंद्रशेखर गोखले, सुहासिनी किर्तीकर, प्रा मिलिंद जोग, प्रतिभा सराफ, प्रतिभा बिस्वास, सुबोध (गणेश) आचवल, ज्योती कपिले, अरुण फडके, सावित्री हेगडे. मनन भालेराव, अनुपमा उजगरे, धनश्री धारप, प्रियांका बांदिवडेकर, एकनाथ आव्हाड, मिनाक्षी जयकर, अरुण जोशी, संगिता अरबुने, अर्पणा साठे, दीपाली भागवत, सुभाष भागवत
भालेराव विचार मंच पॅनल - प्रमोद पवार, चंद्रशेखर वझे, डॉ नरेंद्र पाठक, दिलीप भाटवडेकर, विजयराज बोधनकर, गीतेश शिंदे, रविंद्र गोळे, प्रकाश कामत, विकास परांजपे, चंद्रकांत भोंजाळ
ऊर्जा पॅनल ३१ पदांवर तर भालेराव विचार मंच पॅनल १२ पदांवर विजयी झाले आहेत.