मुंबई : राज्याला साथीच्या आजाराचा विळखा पडत असून, गेल्या साडेपाच महिन्यांत मलेरियाचे 4471 रूग्ण तर डेंग्यूचे रूग्ण 2031 आढळले आहेत. तर चिकनगुनियाचे 900 रूग्ण आढळले आहेत. शहरी भागातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे सर्वाधिक रूग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आहेत.
यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्याने साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे राज्यातील जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये 1180, रायगडमध्ये 211, गोंदियात 28 रूग्ण आढळले आहेत. महापालिकांमध्ये मुंबई 2314 पनवेलमध्ये 216, ठाण्यात 128 रूग्ण आढळले आहेत.
राज्यात जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे पालघरमध्ये 133 पुणे 128 ,अकोला 119, सिंधुदुर्ग 66 रूग्ण आढळले आहेत. महापालिकांमध्ये मुंबईनंतर नाशिक 395, अकोला 139 , नाशिक 132, ठाणे 63 रूग्ण आढळले आहेत.
मलेरियाचे रूग्ण सामान्यत: पावसाळ्याच्या म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर आणि डेंग्यूचे रूग्ण सामान्यत: ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांत वाढतात. मुख्य कारण म्हणजे तापमान, आर्द्रता आणि अधूनमधून पडणारा पाऊस यासारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे वेक्टर डासांची पैदास होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते मात्र यंदा जानेवारीपासून रूग्ण आढळत आहेत.
राज्यात 900 चिकनगुनियाचे रूग्ण आढळले आहेत पण गेल्यावर्षीच्या तुलनेत रूग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे 104, अकोला 85, पालघर 69, सिंधुदुर्ग 44 , महापालिका निहाय मुंबई 119 , अकोला 101, सांगली मिरज 24 रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात लेप्टोचे एकूण 121 रुग्ण आढळले आहेत, तर स्क्रब टायफसचे 18 आणि जपानी तापाचे 3 रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे एकूण 204 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सर्वाधिक 42 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये 36, पुण्यात 31, नागपूरमध्ये 27, ठाण्यात 21, छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 आणि कोल्हापूरमध्ये 17 रुग्ण आढळले आहेत. .
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या 135 दिवसांत एकूण 1004 रुग्ण आढळले आहेत ज्यात कॉलराचे 22, गॅस्ट्रोचे 32, अतिसाराचे 414, सांध्याचे 513 आणि टायफॉइडचे 22 रुग्ण समाविष्ट आहेत. यापैकी सांध्याने ग्रस्त असलेल्या तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत बर्ड फ्लूचे 73 रुग्ण आढळले आहेत यामध्ये नागपूर ग्रामीणमध्ये 14 नागपूर शहरात 10 आणि धाराशिव जिल्ह्यात 45 रुपये आढळले.
नागपूरमध्ये डिसेंबर 2024 मध्ये एव्हीएनची केस एकूण 3 वाघ आणि 1 चित्त्यामध्ये आढळली आली. आढळलेल्या केसचा तीन किलोमीटर परिसरात आय एल आय सर्वे करण्यात आला. एच 5 एन1 साठी संशयित रुग्णांचे नेसेल स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविले. उद्रेकाच्या दहा किलोमीटर परिसरात पॅसिव्ह सर्वे करण्यात आला.
गेल्या व गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईमध्ये साथीच्या आजारांची वाढ झालेली असून लॅक्टोपायरीसिसमध्ये रुग्णसंख्या घटलेली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आढळलेली रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा जूनच्या पंधरा दिवसातील रुग्ण अधिक असल्याचे दिसून येत आहे.