Malad Marve Road accident  Pudhari
मुंबई

Mumbai Accident: मुंबईत विचित्र अपघात, दुचाकीस्वाराचा मान कापून दुर्दैवी मृत्यू

खासगी बसच्या लगेजचे झाकणा उघडल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

Malad Marve Road accident

मालाड : मालवणीतील मार्वे रोडवर मंगळवारी (दि.२४) दुपारी घडलेल्या धक्कादायक अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. अनधिकृतपणे रस्त्यावर उभी असलेल्या खासगी बसच्या लगेजच्या झाकणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकी (एमएच ४७ - J १८२१) वरून एक तरुण मालाडच्या दिशेने जात होता. मालवणीतील मार्वे रोडवर अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर अनधिकृतरीत्या उभी असलेल्या ‘माँ ट्रॅव्हल्स’च्या बसचे लगेजचे झाकण क्लिनरने अचानक उघडले. त्याचवेळी मागून येणारी दुचाकी त्या उघड्या झाकणाला जोरात आदळली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीररीत्या दुखापत होऊन मान कापली गेली.

अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला तत्काळ रिक्षामधून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून तो मुस्लिम समाजातील असून उपवास करत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT