Central Railway Disrupted Pudhari
मुंबई

Central Railway Disrupted: पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेलाही ब्रेक! मुलुंडजवळ OHE मध्ये जोरदार स्पार्किंग; लोकल सेवा विस्कळीत

Central Railway Disrupted: मुलुंड स्थानकाजवळ डाउन लोकल मार्गावरील OHE मध्ये बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होऊन मध्य रेल्वेची लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली.

पुढारी वृत्तसेवा

Central Railway Disrupted: पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेच्या लोकलवर परिणाम झाला आहे. मुलुंड स्थानकाजवळ डाउन लोकल मार्गावरील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) मध्ये बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे डाउन मार्गावरील लोकल सेवांवर काही काळ परिणाम झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.53 वाजता डाउन लोकलच्या मोटरमनने डाउन लोकल मार्गावर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि दुरुस्तीचे काम सुरू केले.

MRVCच्या कामादरम्यान वायर पडल्याचा प्राथमिक संशय

मुलुंड स्थानकाजवळ MRVCच्या कामादरम्यान एखादी वायर OHE वर पडल्यामुळे हा बिघाड झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने तपासणी सुरू केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित मार्गावरील तांत्रिक यंत्रणेची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

12.17 वाजता वीजपुरवठा पूर्ववत

दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणीनंतर दुपारी 12.17 वाजता P/RT (Power Restored/Power Restoration) झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे संबंधित मार्गावरील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान, OHE बिघाडामुळे डाउन लोकल मार्गावरील सेवांवर काही काळ परिणाम झाला. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT