मुंबई

Mumbai Crime : मुंबई लोकल मारहाण प्रकरणी ‘संशयित’ पोलिसांच्या ताब्यात; महिलेला ‘ट्रान्सजेंडर’ सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अंधेरी जीआरपीकडून तपास सुरू; एफआयआर दाखल करून अटकेची कारवाई होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणात रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अन्सारी नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल

चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या अन्सारीने दावा केला होता की, ज्या व्यक्तीशी त्याचा वाद आणि मारहाण झाली, ती महिला नसून 'ट्रान्सजेंडर' आहे. मात्र, रेल्वे पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मारहाण झालेली व्यक्ती ही महिलाच असून ती नेपाळी नागरिक असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली. आरोपीने कारवाईपासून वाचण्यासाठीच हे खोटे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

महिलेला शोधून जबाब नोंदवण्याचे काम सुरू

रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत पीडित नेपाळी महिलेचा शोध घेतला असून सध्या तिचा अधिकृत जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास 'अंधेरी जीआरपी' करत आहे.

गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई होणार

सध्या अन्सारीला केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पीडित महिलेचा जबाब पूर्ण झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा (FIR) दाखल केला जाईल आणि त्याला औपचारिक अटक करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. लोकल ट्रेनमधील अशा प्रकारच्या हिंसाचारावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT