मुंबई : तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये मुंबई शहराला दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा अवघ्या चार दिवसात जमा झाला. सध्याचा पाणीसाठा 3 लाख 64 हजार 233 दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे.
16 जूनला तलावातील पाणीसाठा 8 टक्केवर पोहचला होता. त्यामुळे मुंबई शहरात 10 ते 15 टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता होती. मात्र तलाव दमदार पाऊस झाल्याने अवघ्या चार दिवसात म्हणजे 20 जून सकाळी 6 वाजेपर्यंत तलावातील पाणीसाठा 25.17 टक्केवर पोहचला. 16 जूनला 1 लाख 24 हजार 471 दशलक्ष लिटर्स इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. मात्र 20 जूनला हा पाणीसाठा 3 लाख 64 हजार 233 दशलक्ष लिटर्सवर पोहचला. त्यामुळे मुंबईकरांची पाणीटंचाईची भीती जवळपास संपुष्टात आली आहे.
भातसा तलावातील पाणीसाठा 43 हजार दशलक्ष लिटर्सवर पोहचला होता. चार दिवसात हा पाणीसाठा 20 टक्केवर म्हणजे 1 लाख 48 हजार दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरनाक तलावाचा एक टक्क्यांपेक्षा खाली गेलेला पाणीसाठा आता 26 टक्के झाला आहे.