Mumbai High Alert Unknown Person stole a rifle :
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नेव्ही नगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भरलेल्या ‘इन्सास’ रायफलची चोरी झाली आहे. या रायफलसोबत तीन मॅगझिन आणि 40 जिवंत काडतुसेही गायब झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यानुसार मुंबईत हाय अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर अज्ञात व्यक्ती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कफ परेड पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आणि नौदल संयुक्तपणे या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे मुंबईच्या संवेदनशील भागात सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याच होती.
नेव्हीच्या गणवेशात आलेल्या एका व्यक्तीने ड्युटीवर असलेल्या अग्निवीरला ‘तुझी ड्युटी संपली आहे, तू आराम कर’ असे सांगितले. त्याने अग्निवीरच्या हातातील रायफल घेतली. अग्निवीरला त्या व्यक्तीची ओळख नव्हती. मात्र तो नेव्हीच्या अधिकार्याच्या गणवेशात असल्याने त्याला कोणताही संशय आला नाही.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की नेव्ही ऑफिसरच्या वेशात आलेल्या व्यक्तीनं सामान्य नागरिकांसारखी कपडे घातली. त्यानंतर त्यानं राफयल आणि मॅगझीन या कंपाऊडच्या पलीकडे टाकली. हा संशयित व्यक्ती नेव्ही रहिवाशी भागात जवळपास तीन तास होता. त्यानंतर त्यानं पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे या व्यक्तीनं मास्क घातला होता.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सध्या यासाठी कोणत्या आतल्या व्यक्तीची साथ आरोपीला मिळाली आहे का याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ज्या अग्नीवीरानं त्याची जागा आणि रायफल या तोतया नौदल अधिकाऱ्याकडे देण्यापूर्वी एसओपी फॉलो केली होती का याची देखील चौकशी होणार आहे.
याबाबत कफ परेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाबाबत अजून माहिती मिळाल्यानंतर काही कडक कलमं देखील लावण्यात येतील असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पोलिसांना संशयितानं यापूर्वी या ठिकाणीची रेकी केल्याचा संशय आहे.
इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम (इन्सास) रायफल शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई) ने डिझाईन केली आहे व आयुध निर्माणी बोर्डाने उत्पादन केले.
मुंबईतील नौदलाच्या निवासी एक रायफल व दारूगोळा चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती. नौदलाच्या गणवेशात आलेल्या एका व्यक्तीने कनिष्ठ जवानाला त्याची ड्यूटी संपली असून तुझ्या जागी आता माझी ड्यूटी असल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने रायफल आणि दारूगोळा चोरत पळ काढला.