Mumbai Health News (Pudhari File Photo)
मुंबई

Mumbai Health News: ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना दिलासा, माहिमला होणार राहण्याची सोय

रुग्णालयांनी शिफारस केलेल्या पालकांना इथे राहण्याची सोय केली जाते. माहीम (पश्चिम) येथील प्रमुख बालरोग रुग्णालयांजवळील 3,200 चौरस फूट जागेवर पसरलेल्या या सुविधेत 16 पूर्णपणे सुसज्ज खासगी खोल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधून मुंबईमध्ये आपल्या मुलाच्या उपचारासाठी येणार्‍या पालकांना आणि नातेवाईकांना जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यासाठी माहीममध्ये रोसाला मॅकडोनाल्ड हाऊस उघडण्यात आले आहे. हे देशातील पहिले रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस आहे.

रुग्णालयांनी शिफारस केलेल्या पालकांना इथे राहण्याची सोय केली जाते. माहीम (पश्चिम) येथील प्रमुख बालरोग रुग्णालयांजवळील 3,200 चौरस फूट जागेवर पसरलेल्या या सुविधेत 16 पूर्णपणे सुसज्ज खासगी खोल्या आहेत. ते दरवर्षी 500 हून अधिक कुटुंबांना आधार देऊ शकतात.रोसाला मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये पौष्टिक अन्न पुरवले जाईल.

वाहतूक व्यवस्था देखील केली जाईल. आवश्यक समुपदेशन देखील दिले जाईल. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कर्मचारी 24 तास उपलब्ध असतील. इथे स्वयंपाकघर आणि खेळण्याची जागा देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT