मुंबई : आठवडाभरापूर्वी अंधेरीत गॅस गळतीमुळे घरात आग लागून हारपळलेल्या तिघांपैकी वीणा प्रदीप भोईट यांचा रविवारी मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी मरोळ भागातील रमाबाई नगर झोपडपट्टीतील एका घरात ही गॅस गळती झाली होती. घरात सर्वजण झोपलेले असताना घरातील महिलेने अचानक सकाळी लाईट लावली. त्यामुळे तत्काळ आगीचा भडका होत तीन जण भाजले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी या दुर्घटनेतील वीणा प्रदीप भोईटे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर नामदेव सकपाळ आणि लक्ष्मी सकपाळ हे दोघेही आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. येथील चाळीतील मजल्यावरील खोली क्रमांक १० मध्ये ही आग लागली होती.
गॅस गळतीच्या दुर्घटनांचे सत्र सुरूच
कांदीवलीत अलीकडेच गळीत झाल्याने गॅसचा स्पोट होत सहाजण होपरळे होते. त्या सर्वजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर महापालिक प्रशासन खडबडून जागे होत गॅस गळतीच्या घटना होवू नयेत यासाठी घरोघरी जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतरही आशा घटनांचे सत्र सुरूच आहे.