मुंबई

जोगेश्वरीत पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलची गॅलरी कोसळली; जीवितहानी नाही

निलेश पोतदार

जोगेश्वरी : पुढारी वृत्‍तसेवा सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रेम नगर मच्छी मार्केट जवळ पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमधील लॅबची गॅलरी कोसळली. ही घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

शाळेची लॅब गॅलरी कोसळली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जवानांनी विटा व मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून, शाळेच्या लॅब गॅलरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळेमध्ये लॅबची गॅलरी कोसळल्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT