मुंबई, पुढारी वृत्तसेवा : धारावी येथील ९० फुटी रोडवर असलेल्या शमा इमारतीमधील तळघरापासून ते सातव्या मजल्यापर्यंत लागलेल्या आगीत तब्बल ३२ जण जखमी झाले. जखमी मध्ये दहा वर्षातील ४ मुले व एक मुलगीचा समावेश आहेत. त्यात एका महिन्याचा मुलगा आहे. ही घटना रविवारी घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. याची नोंद मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे झाली आहे.
याबाबत महापालिकेने दिलेली माहिती अशी की, धारावी येथे रविवारी सकाळी या इमारतीतील इलेक्ट्रिक वायरिंग, तळमजल्यावरील कॉमन पॅसेजमधील सीसीटीव्ही जळले.या आगीने पाचव्या ते ते सातव्या मजल्यावरील पॅसेजमधील भंगार साहित्य जळून खाक केले. सातव्या मजल्यापर्यंत इलेक्ट्रिक डक्टिंग जळाले.सातव्या मजल्यापर्यंत ही आग मर्यादित होती. या प्रकाराची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने अग्निशमन दलाला दिली.जवान घटनास्थळी आले.त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला.चार बंबाच्या सहाय्याने व २ छोट्या होज लाइनचा वापर करुन ही आग आटोक्यात आणली.यात एकूण ३२ जण जखमी झाले.त्यापैकी सायन रुग्णालयात २९ तर खासगी रुग्णालयात तिघांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई महापालिकेच्या सायन येथील रुग्णालयात मस्तान शेख, (वय ३५), खैयुन्स्सा, (६०) रुक्साना शेख, (२६) अयान मस्तान शेख, (१५),निदा तौसिफ शेख ( ३०),सय्यद सलामुद्दीन ( ६७) सय्यद हीन (२६) आयेशा शेख(१६) यांची प्रकृति स्थिर आहेत. तौसिफ (वय ३५) रेवान शेख ( १ महिना), मादिया शेख ( ५), सना दळवी,( २७), रेहान मस्तान (१७) नहर शेख (११), कैफ शेख, (८) नमिरा सय्यद (१९) ,सानिया शेख, ( ११) ,अरफान शेख ( ७) चंद शेख, (४०),नसमीरा सय्यद, (१९) , उमे शिफा (१३), नाझीर अन्सारी,( ३८) ,अतिफा नजीर अन्सारी (१४) ,सुफिया अन्सारी( १०) अहाना अन्सारी ( ७), रुक्साना अन्सारी, (३३), शरीफन बीबिन अन्सारी, (६५) ,अब्दुल वाहिद (४५) ,शबाना शेख,( ३५) यांच्यावर उपचार सुरु आहेत.याचबरोबर धारावी येथील खासगी रुग्णालयात कार्तिक चलैया (वय २२),वनिता चल्लैया( ५१) तर लक्ष्मी चैलैय्या ( २४)यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.याची नोंद झाली आहे.