मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा विषय चिंतेचा बनला आहे. न्यायालयाने रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये आणि खुल्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातल्याचे आदेश दिले असतानाही फटाके फोडताना मुंबईकरांनी अक्षरशः ताळतंत्र सोडल्याचे पाहायला मिळत आहे.
परिणामी, ऐन दिवाळीमध्ये मुंबईत प्रदूषणाचे ढग जमा झाल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे. आर्थिक राजधानीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दुपारी एक वाजेपर्यंत १३१ इतका होता. मात्र, नऊ तासांमध्ये हाच आकडा तीनशेच्या (२७८) घरात गेला.
भांडुपसह अंधेरी आणि वांद्रे परिसरातील हवा सर्वाधिक खराब नोंदली गेली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डॅशबोर्डनुसार, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स हा१३१ इतका होता.
गेल्या तीन वर्षांतील दिवाळीच्या दुपारच्या आकडेवारीशी तुलना करता ही सर्वात नीचांकी नोंद होती. गेल्या वर्षी हा आकडा १९४, २०२४ मध्ये १८१ आणि २०२३ मध्ये १४९ इतका होता.
हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या संकेतस्थळानुसार, रात्री दहा वाजता मुंबईचा सरासरी एक्यूआय २७८ नोंदला गेला. भांडुप, पश्चिममधील हवा (एक्यूआय २७६) सर्वात खराब असली तरी पश्चिम उपनगराला वायू प्रदूषणाने घेरले आहे. भक्तिपार्क (वडाळा), चारकोप, चांदिवली, दहिसर (पूर्व), गावदेवी परिसरातही अतिखराब हवेची नोंद झाली. २०० ते ३०० दरम्यानचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा आरोग्यासाठी घातक हवेच्या पातळीमध्ये मोडतो.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डॅशबोर्डनुसार, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स हा१३१ इतका होता. गेल्या तीन वर्षांतील दिवाळीच्या दुपारच्या आकडेवारीशी तुलना करता ही सर्वात नीचांकी नोंद होती.
गेल्या वर्षी हा आकडा १९४, २०२४ मध्ये १८१ आणि २०२३ मध्ये १४९ इतका होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजमधील (एनआयएएस) वातावरण शास्त्रज्ञ आणि अध्यक्ष प्राध्यापक गुफरान बेग यांच्या मते, समुद्राकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे प्रदूषणामध्ये घट पाहायला मिळाली.
गेल्या ४८ तासांत वाऱ्याच्या दिशेत बदल झाला आहे. समुद्राकडून येणारे वारे वेगाने वाहत आहेत. या प्रक्रियेमुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण नियंत्रित राहिले. रात्री फटाके फोडल्यानंतर प्रदूषकांचे अवशेष हवेत दीर्घकाळ टिकून राहतील आणि प्रदूषणाची पातळी वाढू शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. त्यांचा अंदाज खरा ठरला.
अति प्रदूषित ठिकाणे बोरीवली, पश्चिममध्ये २६९, वांद्रे,
पूर्व येथे २४२, बीकेसीमध्ये आणि इतक्या एक्यूआयची नोंद झाली. गोवंडी (२६५), चांदिवली (२५७) आणि चेंबूरमध्येही (२५८) या ठिकाणी प्रदूषणाचा टक्का वाढला. याचबरोबर भांडुप, पश्चिममधील हवा (एक्यूआय २७६) सर्वात खराब असली तरी पश्चिम उपनगराला वायू प्रदूषणाने घेरले आहे. भक्तिपार्क (वडाळा), चारकोप, चांदिवली, दहिसर (पूर्व), गावदेवी परिसरातही अतिखराब हवेची नोंद झाली.
खुल्या रस्त्यावर श्वास घेणे झाले कठीण
मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरे तिन्ही भागात संध्याकाळपासून प्रचंड फटाके फुटले. प्रचंड आवाज करणारे आणि धूर निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण जास्त होते. दुष्काळामुळे मनसेने यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द केला. त्याची कमी भरून काढण्याच्या नादात मुंबईकरांनी शिवाजी पार्कवर आज फटाक्यांच्या धुराचे ढग निर्माण केले. खुल्या रस्त्यावर श्वास घेणे कठीण करून टाकले.