मुंबई: मुंबई महापालिकेच्या एम. ईस्ट विभागातील तत्कालीन सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांनी बदलीच्या दिवशीच रेडी मिक्स काँक्रीट प्लांटच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
देवनार येथील इंडियाक्रिट रेडी मिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ३१ मार्च २०२७ पर्यंत प्लांट चालविण्याची परवानगी देण्यात आली.
या परवानगीपत्रावर २८ मार्च २०२५ रोजी स्वाक्षरी झाल्याचे दिसत असून, त्याच दिवशी ससाणे यांची एम ईस्ट विभागातून एस विभागात बदली झाली. त्यामुळे या परवानगीच्या प्रक्रियेबाबत आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याविषयी एम.ईस्ट विभागातील सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.
महापालिकेच्या नोंदीनुसार, हा तात्पुरता आरएमसी प्लांट १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका अधिनियमातील कलम ३९० आणि ४७९ अंतर्गत ही परवानगी जारी करण्यात आली. मात्र, परवानगीपत्रावरील तारीख आणि स्वाक्षरीच्या तारखेमध्ये असलेल्या विसंगतीमुळे संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना, पूर्वदिनांकित पत्रावर स्वाक्षरी करण्याबाबत कोणतीही स्थापित प्रक्रिया नसल्याचे सांगितले.
त्यामुळे संबंधित प्रस्तावाला बदलीपूर्वी सर्व आवश्यक मंजुरी मिळाली होती का, फाईल कोणत्या अधिकाऱ्याकडे होती आणि प्रत्यक्षात परवाना कधी तयार करून जारी करण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
महापालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनीही या प्रकरणातील परिस्थितीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सद्भावनेतून स्वाक्षरी केली असण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी सरकारी नोंदी आणि पत्रव्यवहारातून त्याची पडताळणी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कामकाजाच्या वेळेचेही बंधन नाही
या परवानगीमध्ये प्लांटच्या कामकाजाच्या वेळेवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. तसेच प्लांटची क्षमता २४१.२ हॉर्सपॉवर आणि क्षेत्रफळ २४९.१२ चौरस मीटर नमूद करण्यात आले आहे. नूतनीकरण शुल्क आणि अनामत रकमेसह विविध आर्थिक बाबींचाही परवानगीपत्रात उल्लेख आहे.