मुंबई : मुंबई शहरासह तलावाच्या क्षेत्रातील उखाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणीसाठ्यातही मोठी कपात झाली आहे. गेल्या १४ दिवसात २५ हजार ८४१ दशलक्ष लिटर्स इतकी पाण्यामध्ये घट झाली असून पाणीसाठा १४ लाख ३२ हजार दशलक्ष लिटरवरून १४ लाख ६ हजार दशलक्ष लिटरवर आला आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव यंदा १०० टक्के भरलेच नाही. सातही तलावामध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पण ३ ऑक्टोबरपर्यंत १४ लाख ३२ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला. त्यामुळे १५ हजार दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासली. आता तर उकाडा सुरू झाल्यामुळे पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. २०२४ मध्ये ३ ऑक्टोबरपर्यंत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात १४ लाख ४० हजार ४७३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला होता. यावेळी ३ ऑक्टोबरपर्यंत पाणीसाठा १४ लाख ३२ हजार १६४ दशलक्ष लिटर इतका झाला. २०२३ मध्ये हाच पाणीसाठा १४ लाख ३७ हजार ४१७ दशलक्ष लिटर इतका होता. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा त्याला व कमी भरली.
दरम्यान ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे उकाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे थंडी पडेपर्यंत तलावातील पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळी दिवसेंदिवस घट होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
अशी झाली घट
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
३ ऑक्टोबर १६ ऑक्टोबर
अप्पर वैतरणा २,२७,०४७ २,२७,०४७
मोडकसागर १,२८,९२५ १,१३,०८१
तानसा १,४३,२९९ १,३९,१००
मध्य वैतरणा १,९१,९०९ १,९३,४७९
भातसा ७,०५२४० ६,९८,१०६
विहार २७,६९८ २७,६९८
तुळशी ८,०४६ ७,८१२