मुंबई : Maharashtra Election 2024 | मुंबईतील डबेवाल्यांचा भारतीय जनता पार्टी आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा आहे, अशी माहिती उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुळे यांनी मुंबई प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उल्हास मुके म्हणाले, काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे मुंबईच्या डबेवाल्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भारतीय जनता पार्टी व महायुत्ती उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. महायुतीने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह जी कामे केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात आला आहे. आमची संघटना १८९० पासून कार्यरत आहे. १३४ वर्षांमध्ये आजतागायत संघटनेने कोणत्याही राजकीय संघटनेला पाठिंबा दिला नव्हता. मात्र, डबेवाल्यांसाठी महायुती सरकारने केलेली कामे पाहता आम्ही महायुतीला पाठिंबा देत आहे. काही जण स्वतःला डबेवाल्यांचे नेते म्हणवून घेणारे काही अन्य राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे गैरसमज पसरवत आहेत. मात्र, हे पदाधिकारी खरे नव्हे तर तोतये पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर डबेवाल्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी दाखल तर काही प्रकरणात तर गुन्हे दाखल आहेत.