Mumbai couple attacked Kurla viral video
मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात फोटो काढत असलेल्या तरुण-तरुणीची टोळक्याने छेडछाड करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० ते १२ अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांना घेरून ही मारहाण केली.
या प्रकरणी पीडित तरुण-तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि. २०) घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला होता. सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महापालिकेच्या उद्यानात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.