Uddhav Thackeray Pudhari
मुंबई

Mumbai Corporator Disqualification: गोवंडीचे शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द; ठाकरेंचा आणखी एक सदस्य घटला

मुंबई महापालिका सभागृहात सोमवारी महापौर रितू तावडे यांनी अधिकृत घोषणा केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे कांजूर येथील नगरसेवक दीपक सावंत यांच्यानंतर गोवंडी प्रभाग क्रमांक १३७ मधील एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे नगरसेवक पद अखेर रद्द झाले आहे. मुंबई महापालिका सभागृहात सोमवारी महापौर रितू तावडे यांनी अधिकृत घोषणा केली.

प्रभाग आरक्षणामुळे अनेकांना नगरसेवक पदापासून दूर राहावे लागते. त्यामुळे काही नगरसेवक जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवतात. पण या विरोधात विरोधकांकडून तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना नगरसेवक पद गमवावे लागत आहे.

अलीकडेच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असलेल्या कांजूर एस विभाग प्रभाग क्रमांक १११ मधून नगरसेवक बनलेले शिवसेना ठाकरे गटाचे दीपक सावंत यांचे पद रद्द झाले होते.

आता नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असलेल्या गोवंडी एम-पूर्व विभागातील १३७ प्रभागातून निवडून आलेल्या एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.

पटेल यांचे जात प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरल्यामुळे त्यांना पद गमवावे लागणार हे निश्चित होते. अखेर सोमवारी त्यांचे पद रद्द झाल्याची घोषणा महापौरांनी केली. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या आठवरून आता सात झाली आहे.

शिवसेनेसाठी फायदेशीर

एमआयएमच्या नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे प्रभाग क्रमांक १३७ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आयशा रफिक शेख यांना नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे. मात्र हा निर्णय सर्वस्वी कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT