Mumbai Chemical spill चेंबूर च्या म्हैसूर कॉलनी मोनोरेल स्टेशनजवळ टँकर मधून घातक केमिकल लिकेज झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. गळती होत असलेले रसायन आरोग्यासाठी घातक असल्याने आजूबाजूच्या विभागातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर येत आहे.
या केमिकलचे नाव बेंजील माहिती समोर आली असून परिस्थिती निंयत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुराक्षतीतेचा उपाय म्हणून परिसरात रहदारीसाठी केला बंद केला आहे.
ही घटना RCF पोलीस ठाणे हद्दीत मैसूर कॉलनी येथे घडली असून टँकर क्र. GJ 05 CU 9629 मधून बेन्झीन नामक केमिकलची गळती झाली. फायर ब्रिगेड व BPCL तज्ज्ञ घटनास्थळी असून केमिकल दुसऱ्या टँकरमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे. आवश्यक बंदोबस्त व डिमार्केशन करण्यात आले असून वाहतूक वळविण्यात आली आहे.