तब्बल ९४ वर्षांचे आयुर्मान पूर्ण केलेल्या आणि मुंबई उपनगरीय रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पुनर्विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. file photo
मुंबई

Mumbai Central Railway Station : मुंबई सेंट्रलचा होणार कायापालट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : तब्बल ९४ वर्षांचे आयुर्मान पूर्ण केलेल्या आणि मुंबई उपनगरीय रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पुनर्विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने (आरएलडीए) स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला आहे. सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रीकरण आणि गर्दीमुक्त स्थानकासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठळक वैशिष्ट्‌यांच्या आधारे पुनर्विकास करण्यात येणार आहे. सध्या ग्राऊंडमध्ये असलेली उपनगरीय रेल्वे कार्यालये, विश्रामगृहे, मीटिंग हॉल व इतर सुविधा ग्रँट रोड, महालक्ष्मी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरु आहे, यासाठी २ हजार ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर आता मुंबई सेंट्रल स्थानकाचा कायापालट करण्याच्या कामांनी वेग घेतला आहे

स्थानकाच्या पुनर्विकासाचा आढावा घेण्यासाठी जुलैमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल स्थानकाला भेट दिली. स्थानकाचा पुनर्विकास केल्यानंतर २०६५ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या ६ लाख ५० हजारांपर्यत हाताळणे शक्य होणार आहे.

स्थानकाच्या पुर्नविकासात प्रवासी आणि पार्सल प्रवेश/निर्गमन यांच्यासाठी स्वतंत्र प्लाझा असणार आहे. वरचा कॉनकोर्स २७ हजार ५१६ चौरस मीटर आणि खालचा ३४ हजार ३६६ चौरस मीटर असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचे कार्यालय, सहा मजली इमारतीत असून, ग्रँट रोड येथील १९ व्या शतकातील पार्सल डेपोमध्ये ०.६८ हेक्टरवर पसरलेल्या आणि सध्या रेल्वे पोलिस वापरत असलेल्या पार्सल डेपोमध्ये राहतील. याशेजारी आणखी एक हेक्टर भूखंडाचेही व्यापारीकरण होण्याची शक्यता आहे. सहा मजली इमारतीत असलेली उर्वरित कार्यालये आणि मालमत्ता रेल्वे यार्डाजवळील महालक्ष्मी येथे हलवण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT