BMC dewatering pumps pudhari photo
मुंबई

BMC dewatering pumps : पावसाळ्यात सखल भागांतील पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंपांचा वापर

पालिका तिजोरीवर १०.१५ कोटींचा वाढीव भुर्दंड; प्रस्ताव ‘स्थायी’मध्ये येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पावसाळ्यात मुंबईतील सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या पाण्याच्या उदंचन संचांवर मुंबई महापालिकेचा वाढीव खर्च झाला आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमुळे २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत ठिकठिकाणी अतिरिक्त पंप बसवण्यात आल्याने पालिकेच्या मूळ कंत्राट खर्चात सुमारे १० कोटी १५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीव खर्चासह सुधारित कंत्राट रकमेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

आपत्कालीन गरजेनुसार कंत्राटदाराकडून मंजूर दरांवर २५ टक्के अतिरिक्त पंप घेण्याची तरतूद मूळ मंजुरीत करण्यात आली होती. त्यानुसार, २०२४ च्या पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या अतिरिक्त ४६ ठिकाणी आणि २०२५ च्या पावसाळ्यात तब्बल ८० ठिकाणी संबंधित प्रभागांच्या सहायक आयुक्तांनी वाढीव पंपांची मागणी केली होती.

यामध्ये प्रामुख्याने कुर्ला, चेंबूर, अंधेरी, दादर, परळ, घाटकोपर, कांदिवली, मालाड आणि बोरिवली यांसारख्या सखल व पूरप्रवण भागांचा समावेश होता. स्थानिक गरजेनुसार कंत्राटदारांमार्फत हे वाढीव पंप तातडीने कार्यान्वित करण्यात आले.

१३१ कोटीचे सुधारित कंत्राट

अतिरिक्त पंपांच्या वापरामुळे मूळ कंत्राट रकमेवर केवळ ८.३४ टक्के अतिरिक्त खर्च झाला आहे. कंत्राटातील अटींनुसार आवश्यक फेरफार व वजावट केल्यानंतर पालिकेला १० कोटी १५ लाख ६० हजार ७३४ रुपयांचा वाढीव खर्च आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT