मुंबई: मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागातील रस्त्यावर पाणी भरले. दादर पूर्व येथील हिंदू कॉलोनी परिसरातील रस्ते ही पाण्याखाली गेल्याचे पाह्यला मिळाले. अशा परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांकडून जीव धोक्यात घालून पाण्याला वाट करून दिली जात आहे.
मुंबईतील तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोल ची झाकण उघडली. या मॅनहोल मध्ये कोणाचा अपघात होऊ नये म्हणून पालिकेचे कर्मचारी झाकनाभोवती बसून मुसळधार पावसात स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणा-या बीएमसी कर्मचा-याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुसळधार पावसात अनवधानानं उघड्या मॅनहोलमध्ये पडुन अनेकदा जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे, उघड्या मॅनहोलच्या आजुबाजूनं जाणा-या मुंबईकरांना सावध करण्यासाठी बीएमसी कर्मचा-यानं मॅनहोलच्या झाकणावरच बसुन पहारा दिल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.