मुंबई

मुंबई : आव्हाडांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाड (जि. रायगड) येथील चवदार तळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडले. त्यांच्या विरोधात गुरुवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलन केले.

मंत्रालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलकांची मुंबई पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरला चप्पलने मारत निषेध केला. यावेळी आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यापूर्वीही जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र यांचा अपमान केला होता. सातत्याने चुकीची विधाने करून भारतीय संस्कृती व समाजाशी निगडीत लोकांचा अपमान करणाऱ्या आव्हाड यांच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे यावेळी भाजप कार्यकत्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT