अश्विनी कुमार  pudhari photo
मुंबई

Mumbai crime : मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देणा-या ज्योतिषास अटक

आरोपीने मित्राचा बदला घेण्यासाठी केली खोटी माहिती व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी नोएडा येथील 51 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने 14 दहशतवादी शहरात स्फोटकांसह घुसले असल्याची खोटी माहिती देऊन खळबळ उडवून दिली होती. पोलिसांनी तपास केला असता, हा संदेश एका व्यक्तीला अडकवण्यासाठी आणि त्याचा बदला घेण्यासाठी पाठवल्याचे उघड झाले आहे.

अश्विनी कुमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील पाटणा येथील असून, मागील पाच वर्षांपासून तो नोएडाच्या सेक्टर 79 मध्ये राहात होता. तो स्वतःला ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ असल्याचे सांगत असे. गुरुवारी मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश आला होता, ज्यात 14 दहशतवादी शहरात घुसले असून, त्यांच्याकडे 400 किलो आरडीएक्स आहे, असा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशीच्या काही दिवस आधीच हा संदेश आल्याने पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, हा संदेश नोएडा येथून पाठवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर, नोएडा पोलिसांनी कारवाई करत आरोपी अश्विनी कुमारला अटक केली. चौकशीदरम्यान, कुमारने सांगितले की, एका मित्राने 2023 मध्ये त्याच्याविरुद्ध पाटण्यात एक गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे त्याला तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने मित्राच्या नावाने हा खोटा संदेश पाठवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT